मुंबई | राज्यात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी राज्य सरकारने 30 नव्या इनोव्हा गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
गेल्या वर्षी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी 225 वाहने खरेदी करण्यास राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली होती. त्यानूसार यंदा 15 जिल्ह्यांसाठी 30 नव्या इनोव्हा खरेदी करण्यात येणार आहेत.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर, धुळे, परभणी, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांच्या भेटीवर येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दिमतीला या गाड्या असणार आहेत.
Comments are closed.