बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उपवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही?, नवीन संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | नियमित उपवास (Fast) करणाऱ्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता कमी असते असे आता एका संशोधनातून (Research) समोर आले आहे. नियमित उपास-तापास करणाऱ्या लोकांना विविध प्रकारे लाभ मिळतात. अन्नपचन व्यवस्थित होते, आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने आपल्या जठर आणि पचनक्रियेतील स्नायूंना आराम मिळतो, भरपूर भूक लागते आदी. पण त्यात आता आणखी एक फायदा होणार असल्याचे निष्पन्न झाले.

या अभ्यासात नियमित उपवास करणाऱ्या लोकांना मधूमेह (Diabetes) आणि हृद्यविकाराचा (Heart Attack) धोका कमी असतो, असे निरीक्षणात आले आहे. बीएमजे, न्यूट्रिशन, प्रीव्हेन्शन अँड हेल्थ या साप्ताहिकात  हा आभ्यासक्रम प्रकाशित करण्यात आला आहे. जे रुग्ण नियमितपणे उपवास करुन फक्त पाणी पितात त्यांना त्यांना रुग्णालयात नेण्याचा किंवा मृत्यूचा धोका उपवास न करणाऱ्यांच्या तुलनेत कमी असतो.

अमेरीकन संशोधक बेंजामिन होर्ने यांनी सांगितले की, आम्ही उपवासाच्या अधिक फायद्यांचा शोध घेत आहोत. या अभ्यासात मार्च 2020 आणि फेब्रुवारी 2021 या काळात जेव्हा लस उपलब्ध नव्हती तेव्हा 205 कोरोनाग्रस्तांचे निरीक्षण करुन हे निष्कर्ष काढले. या 205 पैकी 73 जण महिन्यातून किमान एकदा उपवास करतात त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे.

उपवासातचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे, उपवासामुळे शरीरातील खराब आणि निकामी झालेल्या पेशी नष्ट होतात. होर्नेंच्या मते हे फायदे वर्षानुवर्षे उपवास करणाऱ्या लोकांनाच मिळतात. उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक. कारण उपवास कोरोना प्रतिबंधक लस नाही, असेही होर्ने म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

तीव्र विरोधानंतर ‘अग्निपथ’ योजनेबाबत राजनाथ सिंह यांनी घेतली महत्त्वाची बैठक

‘मी काही इतक्या लवकर जात नाही’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

गाडीच्या हॉर्नच्या आवाजावर तरूणांनी केला नागीन डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा खेळ आता वेब सिरीजमध्ये दिसणार; “मी पुन्हा येईन” चा टीझर प्रदर्शित

खासदारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More