बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतातील ‘या’ बड्या कंपनीत मेगाभरती, 1 लाख जागा भरणार

मुंबई | कोरोना संसर्गामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक क्षेत्रांना मंदीला सामोरं जावं लागलं होतं. पण या काळातही आयटी कंपन्या मात्र जोमानं सुरू होत्या. आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरबसल्या काम करण्यास सांगितल्यानं त्यांना मोठा फायदा झाला. कोरोना काळात झालेल्या फायद्यामुळं आयटी कंपन्यांनी आता मोठया प्रमाणावर जॉब्सच्या संधी उपलब्ध केल्या आहेत.

हजारो कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय इन्फोसिस आणि टीसीएस या दोन कंपन्यांनी घेतला आहे. या स्पर्धेत आता कॉगनिझंट या आयटी कंपनीनं देखील उडी घेतली आहे. इन्फोसिस आणि टीसीएस या कंपन्यांना ही कंपनी टक्कर देत आहे. आयटी क्षेत्रात झपाट्यानं होणारी वाढ लक्षात घेता या कंपनीनं तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिसऱ्या तिमाहीत कॉगनिझंटने 17,000 हजारापेक्षा जास्त हेडकाऊंट वाढवला आहे. भारतात 2022 पर्यंत 45 हजार नवीन नियुक्त्या करण्याची या कंपनीची योजना आहे. चालू आर्थिक वर्षात 1 लाख आयटी एक्स्पर्टची नियुक्ती कॉगनिझंट करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसात अनेक कारणांमुळं आयटी क्षेत्रातील संस्थांचा एट्रीशन रेट वाढला आहे.

कर्मचाऱ्यांनी राजीनामा देऊन कंपनी सोडण्याच्या प्रक्रियेत वाढ झाल्यानं याचा परिणाम टर्नओव्हर रेटवर होत आहे. कॉगनिझंटचा एट्रिशन रेट 33% आहे तर, इन्फोसिसचा 20.1% इतका आहे. टीसीएसने 11.9% एट्रिशन रेट नोंदवला आहे. हा एट्रिशन रेट कमी करण्याचा सर्व कंपन्यांचा प्रयत्न आहे. यासाठी अनेक कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांच्या भरती करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

कंगना राणावतच्या अडचणीत वाढ; ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवलं, आता…

“हे आंदोलन त्यांनी उभा केलंय, आता निर्णय देखील त्यांनीच घ्यावा”

नवाब मलिकांना मोठा दणका! मुंबई उच्च न्यायालयाने दिली ‘ही’ सूचना

‘या’ जिल्ह्यांनी देशाची चिंता वाढवली; कोरोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर

“या सर्वांना जबाबदार कोण? मोदी सरकार पूर्ण नापास”; भाजप खासदाराचे खडे बोल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More