New Kia Carnival l आजकाल तरुणांना बाजारात लाँच होणाऱ्या नवनवीन कार खरेदी करायला जास्त आवडतात. अशातच किआ कार्निवलचे मागील मॉडेल भारतात लाँच केले होते. तर त्या मॉडेलला भारतात प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशातच आता या वाहनाचे नवीन मॉडेल भारतात लाँच झाले आहे. नवीन किया कार्निवल ही पूर्णपणे आयात केलेली कार आहे, ज्यामुळे या कारची किंमत मागील मॉडेलच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली आहे.
नवीन किया कार्निवलमध्ये काय खास आहे? :
भारतीय बाजारपेठेत Kia कार्निवलशी स्पर्धा करणारी कोणतीही कार नाही. ही किया कार इतकी मोठी आहे की तिला छोटी व्हॅन देखील म्हणता येईल. नवीन किया कार्निव्हलमध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. यासोबतच नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे.
या Kia कारमध्ये बरीच जागाही देण्यात आली आहे. या वाहनात तुम्हाला वेंटिलेशनसह पॉवर सीट्स मिळतात. या कारमधील लेगरूमची जागा इतकी चांगली आहे की तुम्ही पाय पसरून देखील सहज बसू शकता.
New Kia Carnival l फीचर्स काय आहेत? :
Kia ची ही नवीन कार ADAS आणि 12-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टमने सुसज्ज आहे. वाहनात 360-डिग्री कॅमेराची सुविधा देखील देण्यात आली आहे. या कारमध्ये ड्युअल इलेक्ट्रिक सनरूफसोबतच इतरही अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.
नवीन किया कार्निव्हल पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पॉवरट्रेनसह येत आहे. याचे पेट्रोल व्हेरिएंट स्मूद आहे आणि चांगले पॉवर देते. तर किआ कार्निव्हलचा डिझेल प्रकार देखील अधिक चांगली इंधन कार्यक्षमता देत आहे. ही कार चालवणे देखील खूपच आरामदायक आहे. ही कार 14.85 kmpl चा मायलेज देते. रोड ट्रिपला जाण्यासाठी ही कार चांगली आहे. Kia Carnival ची एक्स-शोरूम किंमत 63.90 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.
News Title – New Kia Carnival Mileage and Features
महत्त्वाच्या बातम्या-
अजितदादा गटात नाराजी! दोन्ही रुपालींमध्ये नेमका वाद काय?
अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्याचं विधान
लाडक्या बहीणींना खरंच दिवाळी बोनस मिळणार?, जाणून घ्या सत्य
सलमानला पुन्हा धमकी? केली ‘इतक्या’ कोटींची मागणी
उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपला मोठा धक्का!