बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे’ नवीन मेड इन इंडिया अ‌ॅप देणार फेसबुकला टक्कर

नवी दिल्ली | मेड इन इंडिया अंतर्गत ७४ व्या स्वातंत्र्य दिवशी Explurger हे अ‌ॅप लाँच करणार आहे. हे मोबाईल अ‌ॅप फेसबुकसारख्या सोशल मीडियाला टक्कर देणार आहे. भारता व्यक्तिरिक्त अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, इराक, सौदी अरेबिया, फ्रान्स, कजागिस्तान अशा विविध देशात हे अ‌ॅप वापरता येणार आहे.

Explurger या अ‌ॅपची निर्मिती खास ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत केली आहे. हे मोबाईल अ‌ॅप आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्राला सपोर्ट करते. कंपनीच्या माहितीनुसार, या अ‌ॅपच्या मदतीने आपल्या शानदार लाईफ इव्हेंटची माहिती मित्र परिवाराला पाठवता येऊ शकते. हे अ‌ॅप आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने स्वतःच ट्रॅव्हल लॉग बनवणार आहे. भविष्यात कुठे यात्रेला जायची योजना असेल तर तीही योजना यात बनवण्याची सुविधा आहे.

Explurger अ‌ॅपचे संस्थापक जतिन भाटिया यांनी सांगितले,”मी सॉफ्टवेअर डेव्हलपर होण्याच्या नात्याने कायम विचार करतो की, अनेक उत्तम अ‌ॅपची निर्मिती भारतीय करतात. पण ते अ‌ॅप शीर्ष स्थानी नाहीत, जिथे ते असायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मार्क झुकरबर्ग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दिग्गजांनी हे अ‌ॅप वापरताना मला पाहायचं आहे.”

नुकतच जुलैमध्ये उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते भारतातील Elyments हे पहिले सोशल मीडिया अ‌ॅप लाँच केलं. वापरणाऱ्याची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी या अ‌ॅपमध्ये एंड टू एंड एनक्रिप्शन दिलेलं आहे. या अ‌ॅपमध्ये चॅटिंग व्यतिरिक्त ई-कॉमर्सची सुविधा देण्यात आली आहे. लवकरच या अ‌ॅपमध्ये ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘देवा… माझ्या वडिलांना बरं कर’; शर्मिष्ठा मुखर्जींची ईश्वराकडे प्रार्थना

गुगलने विद्यार्थ्यांसाठी लाँच केलं ‘हे’ खास अ‌ॅप

ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने राबवली ‘ही’ मोहिम

“एफआयआरने काही होणार नाही संजय राऊत यांना तुरुंगात टाका”

शरद पवारांची पार्थ पवारांवर टीका; फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया, म्हणतात….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More