New Mobile Rules | केंद्र सरकारने स्पॅम कॉल किंवा फ्रॉड कॉलबाबत आता कठोर निर्णय घेतला आहे. सरकारी संस्था टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने ( TRAI ) मोबाईल नेटवर्क संदर्भात नवीन नियम आणले आहेत. हे नियम 1 सप्टेंबर 2024 पासून लागू होणार आहेत. यामुळे मोबाईल वापरकर्त्यांची स्पॅम कॉलपासून सुटका होणार आहे. (New Mobile Rules)
या संदर्भात ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना सूचना देखील पाठविलेल्या आहेत. म्हणजेच, जर तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकावरुन टेलिमार्केटिंग केले तर तुमचा मोबाईल क्रमांक थेट दोन वर्षांसाठी काळ्या यादीत जमा होणार आहे.
टेलिमार्केटिंग करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम मंत्रालयाने नवीन मोबाईल नंबर सिरीज जारी केला आहे. टेलिकॉम कम्युनिकेशन विभागाने नवीन 160 नंबर सिरीज फायनान्शिय फ्रॉड रोखण्यासाठी जारी केलाय. त्यामुळे यापुढे आता बँकींग सेक्टर आणि इन्शुरन्स सेक्टर 160 क्रमांकाच्या मोबाईल क्रमांकाच्या (New Mobile Rules)सिरीजवरुन त्यांचे प्रमोशनल कॉल करतील.
टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे अन वॉण्टेड कॉल्स आणि मेसेजच्या समस्येपासून वापरकर्त्यांची सुटका होणार आहे. या नवीन नियमामुळे अन वॉण्टेड कॉल्स आणि मेसेजवर बंदी घालण्यात येईल. तसेच, ग्राहक अशा अन वॉण्टेड कॉलची तक्रार देखील करु शकतात.
ग्राहक तक्रार कुठे करू शकतील?
जर एखाद्याने 10 आकडी मोबाईल क्रमांकावरुन तुम्हाला फ्रॉड संबंधी मॅसेज पाठविला असेल किंवा कॉल केला असेल तर संचार साथी पोर्टलवर (Sanchar Sathi Portal) तुम्ही या संदर्भात तक्रार करु शकता. तसेच तुम्ही थेट 1909 या हेल्पलाईनला देखील तक्रार करू शकता.(New Mobile Rules)
तक्रार कशी करणार?
सर्वप्रथम sancharsathi.gov.in या वेबसाईटवर जा, आणि सिटीझन सेन्ट्रीक सर्व्हीस या ऑप्शनला स्क्रोल करा.
पुढे टॅबच्या खाली दिलेला पर्याय निवडा आणि नंतर रिपोर्टिंगवर क्लिक करा.
पुढे ड्रॉप-डाऊन मेनूमधून फसवणूक कॅटेगरी निवडा आणि फसवणूक कॉलचा स्क्रीनशॉट अटॅच करा.
पुढे ज्या मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला फसवणूक कॉलचा मॅसेज आला आहे तो मोबाईल क्रमांक टाका.
फसवणूक कॉलची तारिख आणि वेळ तिथे नमूद करा.(New Mobile Rules)
पुढे तुमची सर्व माहिती भरा. नंतर तुम्हाला एक OTP येईल तो टाकून तक्रार सबमिट करा.
News Title- New Mobile Rules from September 1
महत्त्वाच्या बातम्या –
खुशखबर! राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा होणार पोलीस भरती, एकूण पदे किती?
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल?, जाणून घ्या तुमचे राशी भविष्य
सावधान! झपाट्याने पसरतोय मंकीपॉक्स आजार; जाणून घ्या लक्षणं
… तर फडणवीस राजकारणातून निवृत्त होणार? पदाचा राजीनामा देणार
केस मजबूत करण्यासाठी या तेलाचा वापर करा, अवघ्या काही दिवसांत होईल प्रभाव