बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ दोन शहरांत 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला

राज्यात दररोज कोरोना रुग्णसंख्येत भर पडत असल्याचं दिसून येतंय. यामुळे नवी मुंबई आणि ठाणे शहरात 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलाय. ठाण्यात 31 जुलैपर्यंत जाहीर करण्यात आलेला आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलाय. तर नवी मुंबईतील 46 प्रतिबंधित क्षेत्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कऱण्याचा निर्णय घेतलाय.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात यापूर्वी 3 जुलैच्या मध्यरात्रीपासून 13 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 10 दिवसाचा लॉकडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवसांनी त्यात वाढ करून 19 जुलैपर्यंत टाळेबंदी करण्यात आली. आता पुन्हा एकदा शहरात फक्त प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आलाय.

नवी मुंबईत मिशन बिगिन अगेन 3 प्रमाणे मॉल्स, मार्केट व कॉम्प्लेक्समधील दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत समविषम पद्दतीने सुरु राहणार आहेत. पण मॉलमधील उपहारगृहं आणि चित्रपटगृहं बंदच राहणार आहेत. नागरिकांनी नियमात राहून पालिकेला सहकार्य करावे असं आवाहन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलंय.

तर ठाणे शहरात हॉटस्पॉट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मिशन बिगिन अगेन सुरु राहील. यामध्ये प्रामुख्याने मॉल्स, मार्केट, कॉम्प्लेक्स, जीम आणि स्विमिंग पूल वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठ आणि दुकाने पी1 आणि पी2 तत्त्वावर चालवण्यास परवानगी देण्यात आलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीनं आणखी एक निष्ठावंत गमावला; अजित पवारांच्या निकटवर्तीयाचं निधन

बकरी ईद हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभावाचा संदेश देतो, राज्यपालांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

राज्यात आज 10 हजार 320 नवे रूग्ण, पाहा तुमच्या भागात किती…

‘सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांवर युवा मंत्र्याचा दबाव’, भाजपचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More