“औरंगाबाद आणि उस्मानाबादची नवी नावं कधीही घोषित होतील”
औरंगाबाद | राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद नामांतराचा विषय चर्चेत आहे. शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करावं, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यातच आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.
औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याची कागदोपत्री प्रक्रिया व संपुर्ण फाईल तयार झालेली आहे. ही नवी नावं कधीही घोषित होतील. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदेशीर बाबी पूर्ण करणार आहेत, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत खैरे यांनी यावेळी बोलताना दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सभेची आठवण सांगितली आहे. बाळासाहेब ठाकरे सभेत म्हणत होते की, कशाला हवा औरंग्या, त्याने मंदिरे तोडली, संभाजीमहाराजांना त्रास दिला. मग त्याचे नाव कशाला?, असा सवाल चंद्रकांत खैरेंनी केला.
दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. औरंगाबाद नामांतराला काँग्रेसने विरोध दर्शविलेला आहे. तसेच नामांतरापेक्षा आम्ही विकासाला अधिक महत्त्व देतो, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली होती. तसेच शिवसेनेने नामांतराचा मुद्दा उचलून धरल्यानंतर मित्रपक्षांनी किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली होती.
थोडक्यात बातम्या-
विधान परिषदेच्या उमेदवारी संदर्भात पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
“मी आता वयाच्या 85 व्या वर्षात आंदोलन करायचं का?”
काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर जोरदार टीका; म्हणाले…
महाविकास आघाडीत नाराजीचा सूर; ‘या’ नेत्याचे शिवसेनेवर गंभीर आरोप
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.