बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

मुंबई | कोरोना महामारीमुळे महागाईचा भडगा उडालेला पहायला मिळत आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमती वाढल्या असल्याचं पहायला मिळालं. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol, Diesel Price) वाढलेले असून सामान्यांकडून यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे जास्त चिंतेंची गरज नाही. सलग 47 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे.

दरम्यान, इंधन दरवाढ अशीच सुरु राहिली तर पेट्रोल लवकरच 120 लीटरचा टप्पा पार करेल अशी शक्यता आहे. वाढता पेट्रोल आणि डिझेलचा दर पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

मुंबई पोलिसांच्या तपासाला ब्रेक; शाहरूख खानच्या ‘या’ पावलामुळे समीर वानखेडेंना दिलासा

TET घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, आणखी एका बड्या अधिकाऱ्याला अटक

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

“वेळ पडल्यास शिवसेनेमध्ये नाराज असलेल्यांना घेऊन निवडणूक लढवू”

“21 वर्षाखालील मुलगा लग्न करु शकत नाही मात्र लिव्ह-इनमध्ये राहण्यास परवानगी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More