बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आधार कार्ड व्हेरीफिकेशनसाठी नवा नियम! आता ‘ही’ असणार नवी प्रक्रिया

नवी दिल्ली | आधार कार्ड म्हणजे आता सर्वसामान्य ओळख झाली आहे. केंद्र सरकारच्या नियमानूसार आता देशात आधार कार्ड शिवाय कोणतंही महत्वाचं काम नाही होऊ शकत. त्यामुळे आपल्या देशात आधार कार्ड एक महत्वाचं ओळखपत्र आहे. आधार कार्ड संबंधित नियमांत अनेकदा बदल होत असतात आणि वेळोवेळी UIDAI कडून आधार कार्ड संबंधी माहिती दिली जाते.

तर आधार कार्ड पडताळणी अर्थात व्हेरीफिकेशनसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. आता तुम्हाला आधार ऑफलाईन अर्थात कोणत्याही इंटरनेट पुरवठ्याशिवाय किंवा ऑनलाईन देखील तपासता येणार आहे. तर नवीन नियमानुसार तुमच्या सहीला आता जास्त महत्व आहे. आता व्हेरीफिकेशनसाठी तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी असलेले कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत.

तुमची डिजिटल सही असलेले हे कागदपत्रे आधार कार्ड संबंधीची सरकारी संस्था अर्थात UIDAI द्वारे जारी केले जाणार आहेत. तर डिजिटल सही असलेल्या या कागदपत्रावर तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार आकडे दिले जातील. या नव्या नियमावलीत ई-केवायसी ऑफलाईन पडताळणीची सविस्तर प्रक्रिया देखील सांगण्यात आली आहे.

आता ई-केवायसी पडताळणी प्रक्रियेसाठी कोणत्याही अधिकृत एजन्सीला पेपरलेस ऑफलाईन आधार केवायसी देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या नियमानूसार ती एजन्सी आधार धारकाने दिलेला क्रमांक, नाव, पत्ता ही सगळी माहिती केंद्राच्या डेटाबेस सोबत जुळवून बघेल आणि ही सगळी माहिती बरोबर असेल तरच व्हेरीफिकेशनची प्रक्रिया पुढे चालू राहणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढल्या; कस्टम विभागाकडून मोठी कारवाई

ॲमेझॉनवरून चक्क करण्यात येत होती गांजा तस्करी, असा झाला पर्दाफाश

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत 9 महिन्यानंतर मोठी घट

वायु प्रदुषणाच्या समस्येवरून केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! संरक्षण सचिव, गृहसचिव आणि आयबी प्रमुखांच्या कार्यकाळातही बदल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More