बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगातील सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज म्हणून ‘द फॅमिली मॅन-2’च्या नावे नवा विक्रम

मुंबई | ॲमेझॉन प्राईमवर ‘द फॅमिली मॅन 2’ ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. अभिनेता मनोज वाजपेयीने प्रमुख भूमिका साकारलेल्या या वेबसिरिजला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर उचलल्याचं पाहायला मिळत आहे. जगभरात या वेब सिरीजने प्रदर्शित झाल्यानंतर चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.

दरम्यान, जगभरात या वेबसिरीजने चांगलाच धुमाकूळ घातला असून जागतिक पातळीवर चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीस म्हणून ‘द फॅमिली मॅन-2’ ही वेबसिरीज समोर आली आहे. या सिरीजच्या तिसऱ्या भागाची तयारीही जोरदार सुरू झाल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. तसेच समंथा अक्किनेनी या दाक्षिणात्य अभिनेत्रीनंतर नवा दाक्षिणात्य सुपरस्टार तिसऱ्या सीझनमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

आयएमडीबी या रेटींग देणाऱ्या संकेतस्थळावर ‘द फॅमिली मॅन-2’ला 10 पैकी 8.8 स्टार देण्यात आले असून जगातील सर्वोत्कृष्ट पाच वेबसिरीज पैकी चौथ्या क्रमांकाची वेबसिरीज बनण्याचा बहुमान ‘द फॅमिली मॅन-2’ला मिळाला आहे.

अभिनेता मनोज वाजपेयी तसेच दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी या मोठ्या कलाकारांनी काम केलेल्या या वेबसिरिजला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर उचललं. त्यामुळेच जगाच्या पाठीवर या वेबसीरिजने आपलं नाव कोरलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत असलेल्या फ्रेंड्स या सिरीजला देखील ‘द फॅमिली मॅन-2’ने मागं टाकलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

थोडक्यात बातम्या –

“विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही”

बलात्कारासाठी महिलांचे कपडेच जबाबदार – इम्रान खान

आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?; काँग्रेसचा थेट सवाल

‘​​द ग्रेट खली’च्या आई तांदी देवी यांचं निधन

योगाने लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला – नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More