ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली जाहीर!

New Regulations Announced for OTT Platforms in India

OTT Platforms | केंद्र सरकारने ‘ओव्हर द टॉप’ (OTT Platforms) प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) गुरुवारी ही नियमावली जाहीर करताना, ओटीटी प्लॅटफॉर्मला (OTT Platform) वयानुसार कार्यक्रमांचे वर्गीकरण करणे आणि कायद्याने प्रतिबंधित असलेले कार्यक्रम प्रसारित न करण्याचे निर्देश दिले आहेत. सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह विनोदांमुळे वाद निर्माण झाल्यानंतर, सरकारने हे पाऊल उचलले आहे.

‘विवेकबुद्धी वापरावी’

नियमावलीनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्मने कायद्याने प्रतिबंधित असलेले कोणतेही कार्यक्रम प्रसारित करू नयेत. तसेच, वयावर आधारित कार्यक्रमांचे वर्गीकरण करावे. ‘ए’ श्रेणीतील कार्यक्रमांसाठी पालक नियंत्रण (Parental Control) यंत्रणा लागू करावी, जेणेकरून मुलांना असे कार्यक्रम पाहण्यापासून रोखता येईल.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) म्हटले आहे की, “कार्यक्रम प्रसारित करताना आयटी नियम-2021 अंतर्गत निर्धारित आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. आवश्यक ती काळजी घेऊन विवेकबुद्धी वापरावी.”

संसद सदस्य, कायदेशीर संस्था आणि नागरिकांकडून ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही कार्यक्रमांविषयी तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन, कोणताही कार्यक्रम प्रसारित करताना विद्यमान कायद्यांचे आणि आयटी नियम, 2021 चे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आचारसंहितेनुसार, वयानुरूप कार्यक्रमांच्या वर्गीकरणाचे कठोर पालन करणे आवश्यक असल्याचेही मंत्रालयाने नियमावलीत म्हटले आहे. (OTT Platforms)

‘इंडियाज गॉट लेटेंट’ वरील आक्षेप

एका यूट्यूब (Youtube) चॅनेलवरील ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमात आई-वडिलांसंदर्भात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे टीका झाल्यानंतर, सोशल मीडियावरही नियंत्रण असावे, अशी मागणी पुढे आली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेले आहे.

Title : New Regulations Announced for OTT Platforms in India

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .