बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याचा श्वास आणखी थोडा मोकळा होणार; वाचा 14 जूनपासून काय सुरु, काय बंद?

पुणे | पुणेकरांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय. पुण्यात सोमवारपासून मोठी शिथिलता मिळणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नवी नियमावली जारी केली आहे.

नवीन नियमावलीनुसार पुण्यात संध्याकाळी 7 पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार असून मॉल, मल्टिप्लेक्स सिनेमागृह आणि थिएटर हे मात्र बंद असणार आहे. शहरातील विकेंड लॉकडाऊन मात्र कायम ठेवण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे.

पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा 5.16 टक्के इतका असल्यामुळे पुणे शहराचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. आणि या टप्प्यातील निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

वाचा नवीन नियमावली

 • व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील. मात्र, सदर ठिकाणी वातानुकूल ( A.C) सुविधा वापरता येणार नाही.
 • विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा 50 टक्के उपस्थितीत घेणेस परवानगी राहील.
 • कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था हॉलच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
 • अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.
 • मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील.
 • सार्वजनिक वाचनालय सुरू राहतील.
 • मॉल 50 टक्के क्षमतेनुसार सुरु राहतील. मात्र, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील.
 • सोमवारपासून आस्थापनांना सायं. 7 पर्यंत सुरु ठेवता येणार.
 • अभ्यासिका, ग्रंथालय आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
 • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे रात्री 10 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. पार्सल सेवा/घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत सुरु राहील.
 • पुणे महानगरपलिका क्षेत्रामधील बांधकामे नियमितपणे सुरु राहतील.
 • ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.
 • अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
 • उद्याने, खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस स. 5 ते 9 व दु. 4 ते सायं. 7 वाजेपर्यंत सुरू राहतील.

थोडक्यात बातम्या- 

“काँग्रेसमध्ये आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल”

कौतुकास्पद! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा जगताप दाम्पत्याचा निर्णय

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

आनंदाची बातमी! गेल्या 24 तासात पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

खासदार नुसरत जहाॅं यांचा गरोदरपणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More