पुणे | राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आता जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुधारित आदेश जारी केला आहे. सार्वजनिक तसेच गर्दीच्या ठिकाणी अचानक तपासणी होणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
पुणे जिल्ह्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. या नवीन नियामावली नुसार, कोणी मास्क न घातल्याचं आढळून आल्यास 500 रुपयांचा दंड आकरण्यात येईल. तसेच जर दुसऱ्यांदा विना मास्क आढळ्यास 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
लग्न समारंभामध्ये 50 पेक्षा जास्त लोक आढळून आल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी टाळण्यासाठी नोडल ऑफिसची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली असून उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्वाची बैठक बोलवली आहे.
थोडक्यात बातम्या-
राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, खरं तर ही आमची मोठी चूक- विश्वजीत कदम
जिल्हाधिकारी असावा तर असा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय!
“नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं”
“सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन…हाच आहे काँग्रेसचा तमाशा”
पेट्रोल भरताना तरूणाने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ