बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Renault Triber कारचं नवं माॅडल भारतात लाँच; जाणून घ्या 7 सिटर गाडीचे नवे फिचर्स

नवी दिल्ली |  भारतात मोठ्या गाड्यांना चांगली मागणी असते. सध्या भारतीय बाजारपेठेत अशा अनेक आरामदायी कार उपलब्ध आहेत. Renault Triber ची शानचं काही वेगळी आहे. फ्रान्सची कार उत्पादक कंपनी Renault नं आपल्या 7 सीटर कार Renault Triber कारचं नवं व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लाँच केलं आहे. त्यांनी यापूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत कंपनीनं कारमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे ही कार आधीच्या मॉडेलपेक्षा वेगळी आणि अधिक आकर्षक ठरते.

गाडीच्या तिन्ही रोमध्ये एसी वेंट्स, कुल्ड सेंटर बॉक्स, किलेस एंट्री, पुश बटन स्टॉर्ट/स्टॉप, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, पॉवर विंडो आणि रियर वॉश वायपर सारखेही फीचर्स देण्यात आले आहेत. Renault Triber मध्ये प्रोजेक्टर हेडलॅप, LED डे टाइम रनिंग लाईट्स यासह 8 इंचाचा ट्चस्क्रिन एन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. ही सिस्टम अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोद्वारे कनेक्ट केलं जाऊ शकते.

Renault Triber एकूण चार रंगात उपलब्ध आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ व्हेरिंअट्सचा समावेश आहे. याच्या RXE व्हेरिअटची किंमत 5.30 लाख रुपये, तर टॉप मॉडेल RXZ ची किंमत 7.65 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर RXL च्या मॅन्युअल व्हेरिंअटची किंमत 5.99 लाख रुपये आणि ऑटोमॅटीक व्हेरिअंटची किंमत 6.50 लाख रुपये आहे. याशिवाय RXT च्या मॅन्युअल मॉडेलसाठी 6.55 लाख आणि ऑटोमॅटिक व्हेरिअंटसाठी 7.05 लाख रूपयात उपलब्ध केली जाणार आहे.

तसंच या कारमधील तिसऱ्या रोमधील सीट ही डिटॅचेबल आहे. या कारमध्ये कंपनीन 1.0 लीटर क्षमतेचं 3 सिलिंडर असलेलं पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सह येतं. हे इंजिन 70bhp ची पॉवर आणि 96Nm चा टॉर्क जनरेट करतं तिसऱ्या रोमधील सीट या डिटॅचेबल आहेत. तसंच आवश्यकता नसल्यासं त्या फोल्डही करता येतात. सीट फोल्ड केल्यास तुम्हाला 625 लीटरची बूट स्पेस मिळते.

थोडक्यात बातम्या-

“जड्डुला प्रसिद्धी नको आहे, तो शांतपणे सर्वांना मदत करतो”

…अन्यथा कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांवरच दाखल होणार गुन्हे, ‘या’ शहरात नवा नियम

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! लग्नाआधी नवरदेव कोरोना पाॅझिटिव्ह; चक्क पीपीई घालून उरकलं लग्न

“सरकारवर खापर फोडण्याआधी स्वत: शिस्त पाळा”; बेशिस्त नागरीकांना औरंगाबाद खंडपीठाचे खडे बोल

व्हॅाट्सॲपच्या ॲडमीनसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More