Top News तंत्रज्ञान पुणे महाराष्ट्र

शिवजयंती निमित्त खासदार अमोल कोल्हेंनी केला नवा संकल्प!

Photo Credit- Facebook / Amol Kolhe

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने शिवजयंती निमित्त विशेष खबरदारी घेतली आहे. शिवभक्तांसाठी सरकारने मार्गदर्शक सुचना जारी केल्या  आहेत. शिवनेरीवर 144 कलम लागू केल्याने यंदा शिवभक्तांना शिवनेरीवर जाता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी पर्यायी ‘शाश्वत ‘ संकल्प तरुणांसमोर ठेवला आहे.

शिवजयंतीच्या मिरवणुकीची परवानगी नाकारल्याने राज्यसरकार विरोधात नाराजीचं वातावरण आहे. ती नाराजी शमवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते पुढे सरसावले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हेंनी नवीन संकल्पना जनतेसमोर मांडली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंती निमित्ताने 391 झाडं लावण्याचा शाश्वत संकल्प’ खासदार अमोल कोल्हे तरुणांसमोर ठेवला आहे.

स्वतः अमोल कोल्हे जुन्नर वन उपविभाग आणि पुरात्तव विभागाच्या सहाय्याने शिवनेरीवर 391 झाडे लावणार आहेत. तसेच इतर कार्यकर्ते देखील विविध ठिकाणी शाश्वत मानवंदना देण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतीला शिवाजी महाराजांना शाश्वत मानवंदना देण्यासाठी सोशल मीडियाद्वारे तरुणांना आवाहनही कोल्हेंनी शिवभक्तांना दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली- स्वराज्य! त्यांच्या जयंतीला मानवंदनाही ‘शाश्वत’ देऊ या. शिवजयंतीला प्रत्येक गावानं 391 झाडे लावू या, ती जगवू या! या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या, अशा शब्दात कोल्हे यांनी तरुणांना आवाहन केलं आहे.

दरम्यान,  याशिवाय प्रसिद्ध मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर हिरवी मशाल दिसली पाहिजे, असं आवाहन केलं आहे. सयाजी शिंदेही स्वत: शिवजयंतीला पन्हाळगडावर वृक्षारोपनासाठी जाणार आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

संजय राठोडांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

“आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवरून टिव टिव करणारे अमिताभ आणि अक्षय गप्प का?”

गृहिणींचं बजेट कोलमडलं… सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

भारतातील ‘ही’ आहे सर्वात सुरक्षित कार… वाचा सविस्तर

गजानन मारणे जेलमधून सुटलाच कसा- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या