बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नव्या व्हेरिएंटमुळे नवे निर्बंध? अजित पवारांनी दिले संकेत, म्हणाले…

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी आज पुण्यात वेगवेगळ्या प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का? असा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला. यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अनेक देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Corona New Varient) धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अनेक युरोपीयन देशाची चिंता वाढवली आहे. पुण्यात परिस्थिती बरी आहे पण जागतिक पातळीवर नव्या प्रकारच्या व्हायरसचा फैलाव होत असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

नव्या व्हेरिएंटबद्दल फार वेगवेगळ्या प्रकारची मतं असल्याचं अजित पवार म्हणाले. उद्या मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक घेणार आहेत. मात्र काही निर्बंध (Corona Restrictions) पुन्हा आणावे लागतील, असं त्या क्षेत्रातील जाणकारांचं मत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, रशिया या सारख्या देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वाढता फैलाव बघता राज्य सरकार अॅक्शन मोड मध्ये आलं आहे. नव्या व्हेरिएंट बद्दल काय पाऊलं उचलता येतील याची चर्चा उद्याच्या बैठकीत होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात; मुंबईत येताच अडचणी वाढल्या

‘वडिल पुस्तकाला पैसे देत नाहीत, रोज दारु पितात’, मुलाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

“विदेशी माध्यमांना भारताचा विकास पचत नाही”

एसटी आंदोलनावरुन जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा, म्हणाले…

महागाईची झळ; सीएनजीपाठोपाठ आरे दूधही ‘इतक्या’ रुपयांनी महागले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More