बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicronच्या धास्तीनं राज्यात नवे निर्बंध, आजपासून नवे नियम लागू

मुंबई | कोरोना (Corona) महामारीनं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. यातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर डोकं वर काढलेलं पहायला मिळतंय. त्यामुळे नागिरकांमध्ये चिेंतेचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीपासून ओमिक्राॅन (Omicron) व्हेरियंटनं राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

राज्यात ओमिक्राॅनचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याची आज नियमावली जाहीर करण्यात येईल.

राज्यात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या एकूण 1 हजार 179 रुग्णांचं निदान झालं आहे. तर ओमिक्रॉनच्या 23 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच कोरोनामुळे 19 आणि ओमिक्रॉनमुळे 1 अशा 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, डेल्टा प्लस असे वेगवेगळे व्हेरियंट आढळून आले आहेत. कोरोना विषाणू (Coronavirus) दोन वर्षांच्या कालावधीत अनेक वेळा म्युटेट (Mutate) झाल्यामुळे नवे व्हेरियंट्स तयार झाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

मुस्लीम आरक्षणावरून इम्तियाज जलील-नवाब मलिक आमने सामने

कुसुमाग्रजांची कविता, बाळासाहेबांची आठवण अन् फडणवीसांनी लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

“…तर काय मजा येईल ना, मुख्यमंत्री आपण राज्यभर दौरे कराल का?”

मोठी बातमी! ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यात नाईट कर्फ्यू लागू

‘…अन्यथा आम्ही जशास तसं उत्तर देऊ’; एकनाथ शिंदे यांचा भाजपला निर्वाणीचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More