महाराष्ट्र मुंबई

FASTag मध्ये पैसे असतानाही टोलनाक्यावर स्कॅन नाही झालं तर… नक्की वाचा ‘हा’ मोठा नियम

Photo Courtesy- Facebook/ @Official.NHAI

मुंबई | देशभरात 15 फेब्रुवारीपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग बंधनकारक केलं आहे. टोलनाक्यावर खर्च होणारा वेळ वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. पण प्रत्यक्षात मात्र कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव असल्याने पुन्हा ‘पहीले पाढे पंच्चावन्न’चे चित्र दिसून येत आहे.

गायक व संगितकार सलील कूलकर्णी यांनाही काही दिवसांपूर्वी असाच अनूभव आला, फास्टॅगमध्ये रिचार्ज केलेले असतानाही तो स्कॅन न झाल्याने टोल कर्मचाऱ्यांनी दूप्पट टोल भरण्यास सांगितलं पण, मी याबाबत मॅनेजरशी बोललो पण त्यांनीही मला तेच सांगितले, 75 रूपये टोलचे आणि 75 रूपये दंडाची रक्कम भरा आणि जा अथवा इथेच थांबा आम्ही त्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही.

काही वेळानंतर, त्यांच्याच एका छोट्या मशिनमध्ये फास्टॅग स्कॅन झाला आणि मी पूढे निघालो. अशी सर्व गोष्ट सलील यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे. हा सर्व प्रकार घडत असताना माझे 10 मिनिटं वाया गेली त्यामूळे, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणं गरजेचं असून प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

होणारी गैरसोय आणि तांत्रिक अडचणींमुळे लागणाऱ्या लांबच लांंब रांगा टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता रिचार्ज असूनही फास्टॅग स्कॅन नाही झाला तर, गाडीला मोफत सोडण्याचे आदेश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

लस घेतल्यानंतरही उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण!

…तर मी माझी खासदारकी फेकून देतो- खासदार संभाजीराजे

बाबो! एक थाळी संपवा अन् मिळवा एक तोळ सोनं, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर

महाराष्ट्रसह देशातील ‘या’ राज्यातही कोरोनारूग्णांचा वाढला आकडा

इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दिली ‘या’ तीन चेहऱ्यांना संधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या