1 मार्चपासून या पाच गोष्टी बदलणार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री?

New rules Five Things Changing From Today

New Rules | आज, १ मार्च २०२५ पासून, दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या पाच महत्त्वाच्या बदलांची अंमलबजावणी होत आहे. या बदलांमुळे आर्थिक नियोजन करणे सोपे होईल. (New Rules)

१. म्युच्युअल फंड नामनिर्देशन (Mutual Fund Nomination)

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (SEBI) म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यासाठी (Demat Account) नामनिर्देशनाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. १ मार्चपासून, जास्तीत जास्त १० जणांची नावे नॉमिनी म्हणून जोडता येतील.

२. एलपीजी सिलिंडरच्या किमती (LPG Cylinder Prices)

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यामुळे, कमर्शियल गॅस (Commercial Gas) सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम तुमच्या खर्चावर होऊ शकतो.

३. मुदतठेवींवरील व्याजदर (Fixed Deposit Interest Rates)

मार्च महिन्यात बँका मुदतठेवींवरील व्याजदरात बदल करू शकतात. बँका त्यांच्याकडील तरलता आणि गरजेनुसार व्याजदर ठरवतात. याचा परिणाम गुंतवणुकदारांच्या परताव्यावर होऊ शकतो. (New Rules)

४. यूपीआयमध्ये (UPI) विमा-एएसबी सुविधा

प्रीमियम भरणे सोपे करण्यासाठी यूपीआय प्रणालीमध्ये विमा-एएसबी (अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट) ही सुविधा दिली जाईल. याद्वारे तुम्ही प्रीमियमची रक्कम बँक खात्यात ब्लॉक करू शकता.

५. रेल्वे तिकीट बुकिंग नियम (Railway Ticket Booking Rules)

रेल्वेने तिकीट बुकिंग आणि प्रवासाशी संबंधित काही नियम बदलले आहेत. आता वेटिंग लिस्ट (Waiting list) तिकीटधारकांना स्लीपर किंवा एसी कोचमध्ये (AC coach) प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या नियमाचे पालन न केल्यास दंड भरावा लागू शकतो.

Title : New rules Five Things Changing From Today

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .