नवी दिल्ली | प्रत्येकाच्या घरात आता कुटुंबातील सदस्यानुसार दुचाकी आहे. त्यामुळे गाड्यांची संंख्या मोठ्या प्रमाणात वाढली म्हणून रस्तेही मोठे करण्यात आले. मात्र वाढत्या गाड्यांच्या संख्येमुळे आणि रस्ते मोठे करूनही अपघातांची संख्या वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर आता दुचाकी चालकांसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काही नवे नियम काढले आहेत.
दुचाकी चालवणाऱ्यासाठी नाही तर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी हे नवीन नियम आहे. मागच्या सीटच्या दोन्ही बाजूला हँड होल्ड आवश्यक आहे. हँड होल्ड मागे बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आहे. त्यासोबतच गाडीच्या दोन्ही बाजूला पायदाव असायला हवं.
गाडीच्या मागच्या चाकाच्या डाव्या भागातीस अर्धा भाग झाकलेला असायला हवा. म्हणजे तिथे एक सुरक्षित कवर हवा, जेणेकरून त्या भागात मागे बसणाऱ्या व्यक्तिचे कपडे त्यामध्ये अडकू नयेत.
दरम्यान, गाडीला हलकासा कंटेनर लावायला सांगितला आहे. त्याची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिली आणि उंची 500 मिमीपेक्षा जास्त नसावी. तो कंटेनर जर ड्रायव्हरच्या मागील बाजूला लावला तर त्या गाडीवर एकालाच बसण्याची परवानगी आहे. कंटेनर दुसऱ्या सीटच्यामागे लावला तरच दुसऱ्यालाही गाडीवर बसण्याची परवानगी असणार आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मोदी सरकारमधील नेत्यांना 80 वर्षांच्या शरद पवारांची भीती आहे”
2020 मध्ये ‘कोरोना’ नव्हे तर ‘हा’ शब्द ॲानलाईन डिक्शनरीत सर्वाधिक शोधला गेला!
अमिताभ कांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे भडकल्या; म्हणाल्या…
भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
कोरोनाबाधित रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर्स लावू नका- सर्वोच्च न्यायालय
Comments are closed.