बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोमवारपासून पिंपरी-चिंचवडमध्ये नवे नियम होणार लागू; काय सुरू, काय बंद? वाचा एका क्लिकवर

पिंपरी चिंचवड | महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लॉकडाऊन घोषित केला. त्यानंतर आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असताना विविध भागांमध्ये नागरिकांना शिथिलता देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता सोमवारपासून नवी नियमावली लागू होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी आता नवी नियमावली जाहीर केली आहे. पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकानं ही आता संध्याकाळी 4 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही आता सुरू राहणार आहेत. तसेच शनिवार व रविवार फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानं सुरू राहतील. त्यासोबतच तुर्तास माॅल्स व सिनेमागृहांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

पिंपरी चिंचवडमधील हॉटेल्स, रेस्टॉरंट व फूड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शनिवार व रविवार फक्त घरपोच सेवा देता येणार आहे. त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांना हॉटेलमध्ये ग्राहकांना सेवा देण्याची मुभा असणार आहे. पण त्यासाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. संध्याकाळी 5 नंतर कलम 144 लागू होणार आहे. त्याबरोबरच दिवसा 5 वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यास मुभा असणार नाही.

त्याबरोबरच, सार्वजनिक उद्यानं व इतर खुली मैदानं आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेमध्ये नागरिकांसाठी सुरू असणार आहेत. त्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक सेवा ही आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहे. दरम्यान, दारू विक्रीची दुकानंही सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच शनिवार व रविवार संपुर्णतः बंद राहणार असून ग्राहकांना घरपोच सेवा देता येणार आहे. खाजगी वाहनातून तसेच बस व रेल्वेमधून आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

“…म्हणून नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणं अयोग्य”

“संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाही”

कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त, मी रोज करते तुम्ही पण करा- हेमा मालिनी

भारतात आढळला कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट; रूग्णाच्या शरीरात होतोय ‘हा’ बदल

‘या’ कारणामुळे पुण्याची तिसऱ्या स्तरात घसरण झाली, अन्यथा निर्बंध हटले असते!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More