‘जय मल्हार’च्या यशानंतर महेश कोठारे घेऊन येत आहेत ‘विठू माऊली’!

मुंबई | छोट्या पडद्यावर महेश कोठारे यांनी चांगलाच जम बसवला आहे. जय मल्हार या मालिकेच्या यशानंतर आता ते ‘विठू माऊली’ नावाची मालिका घेऊन येत आहे.

पंढरीच्या पांडुरंगावर आधारित ही मालिका असणार आहे. त्यामुळेच आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर त्यांनी या मालिकेची घोषणा केली. स्टार प्रवाह या वाहिनीवर ही मालिका दाखवण्यात येणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या