बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; नवं गाणं लवकरच येणार

मुंबई | भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या नेहमीच काही न काही कारणावरुन चर्चेत असतात. एक बँकर, राजकारण्याची पत्नी ते आता गायिका (Singer) म्हणून त्यांचा प्रवास झाला आहे. त्यांची बरीच गाणी आतापर्यंत आली आहेत. आणि लोकप्रिय देखील झाली आहेत. आता आणखी एक नवीन गाणं त्या लवकरच घेऊन येत आहेत.

त्यांच्या नव्या गाण्याचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘वो तेरे प्यार का गम’ या त्यांच्या नव्या गाण्याचं पोस्टर नुकतंच आलं आहे. अमृता फडणवीस यांनी स्वत: पोस्टर प्रसारीत करत ही माहिती दिली. त्यांनी म्हंटलं आहे. लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना… लफ्ज नए है, पर रंग वही सुहाना….! तसेच अमृता फडणवीस यांनी सारेगम या म्युझिक कंपनीचे आभार मानले आहेत.

अमृता फडणवीस यांनी वेगवेगळ्या स्वरुपाची गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहेत. आता या नव्या गाण्यातून गोल्डन मेलोडी पहायला मिळणार आहे. अमृता फडणवीस आता ‘वो मेरे प्यार का गम’ है “माय लव्ह” या 1970 मध्ये आलेल्या सिनेमातील गाणे पुननिर्मित करणार आहेत. तेव्हा हे गाणे अभिनेते शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.

अमृता फडणवीस यांनी यापूर्वी शिवतांडव, तेरी बन जाऊंगी अकॉस्टिक, ये नयन डरे डरे, मोरया रे, बेटिया प्राइड ऑफ नेशन, सड्डी गल्ली रेल गड्डी, कुणी म्हणाले, तिला जगुद्या, पेटूनी उठू दे आज, अशी अनेक गाणी गायली आहेत. त्यांचं नवं गाणं कसं असेल आणि त्यात त्या कोणत्या अवतारात दिसणार आहेत, याकडे त्यांच्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील आणि तुम्हाला नागडं करतील”

“धर्मवीर आनंद दिघेंवर सिनेमा काढला, तो आवडला नाही, म्हणून…”

“बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांची मला फार काळजी वाटते, त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र”

“मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री राज्याचा भार वाहत असताना राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजतायत का?”

ललित मोदींच्या प्रेमात पडण्यापूर्वी सुष्मिताच्या ‘या’ 10 अफेअर्सचीही रंगली होती खूप चर्चा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More