Top News आरोग्य कोरोना देश

समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण; दिसत असेल तर लगेचच हाॅस्पिटल गाठा!

लंडन |  देशांमधील तज्ज्ञ कोरोनावरील औषध शोधण्याच्या मागे आहेत. मात्र अजूनही यावर ठोस औषध मिळू शकलेलं नाही. सर्दी, ताप, खोकला, कफ, घश्यात खवखव अशी लक्षणे आत्तापर्यंत कोरोना रुग्णांमध्ये दिसत होती. मात्र आता त्यात आणखी काही लक्षणांची भर पडलीये. ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांमध्ये नवं लक्षणं आढळून आलंय. कोरोना रुग्णांच्या त्वचेवर रॅशेश  येत असल्याचं आढळून आलं आहे.

किग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या डॉक्टरांनी 20 हजार रुग्णांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. ब्रिटनमधल्या 9 टक्के लोकांच्या त्वचेवर रॅशेश येत असल्याचं आढळून आलंय. तर 8 टक्के लोकांना इतर लक्षणांसोबतच त्वचेवर रॅशेश असल्याचं दिसून आलं. प्रत्येक 11 कोरोना रुग्णांमागे एका रूग्णाला त्वचेवर रॅशेश येत असल्याचं आढळलंय.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनेक देशांमध्ये काही लक्षणं वेगवेगळी आढळून आली आहेत. स्थानिक वातावरण, लोकांची जीवनशैली आणि इतर परिस्थितीमुळे काही वेगळी लक्षणं दिसतायत.

गंध न येणं, अशक्तपणा, भूक न लागणं, डायरिया अशीही लक्षणं भारतात आढळून आली आहेत. त्यात आता हे नवं लक्षणं आढळून आल्याने सगळ्यांनाच काळजी घेण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘नया है वह’ म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…..”

एअर इंडियाचा मोठा निर्णय; पाच वर्षांसाठी कर्मचाऱ्यांना पाठवणार विना पगारी सक्तीच्या रजेवर

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या दुपारी ‘या’ तीन वेबसाईटवर पाहता येणार निकाल

‘ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको’; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या