बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! 50 टक्के लोकांमध्ये आढळली कोरोनाची ‘ही’ नवी लक्षणं

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येचा रोज एक नवा उच्चांक नोंदवला जात आहे. अशात एक महत्वाची आणि चिंताजनक माहिती समोर आली. 50 टक्के लोकांमध्ये कोरोनाची नवी लक्षणं आढळली आहेत.

कोरोनाच्या अर्ध्या रुग्णांमध्ये यावेळी अशी लक्षणं आढळली आहेत,जी याआधी कधी दिसली नव्हती. यात तोंड कोरडं पडणं हे प्रमुख लक्षण आहे, असं राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेनं म्हटलं आहे. लागण झाल्यानंतर सुरुवातील हे लक्षण जाणवत असल्याचं म्हटलं जात आहे.

कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये जीभ कोरडी पडणं देखील एक लक्षण आहे. हेदेखील लाळ तयार न झाल्यानं होतं. यादरम्यान जीभ पांढरी पडल्यासारखं वाटू शकतं. ज्या रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळतात त्यांनी जेवण करतानाही त्रास होतो. लाळ नसल्यानं अन्न चावणंही अवघड जातं. याशिवाय बोलतानाही त्रास होत असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशभरात धुमाकूळ घातला आहे. चिंतेची बाब म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून बाधित रुग्णांमध्ये नवनवी लक्षणेही दिसून येत आहेत. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या- 

सिनेसृष्टीला मोठा धक्का; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन

‘लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो, पण…’; समोर आली ही महत्वाची माहिती

“…तर मग कुंभमेळाव्यातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा?”

“याला म्हणतात ठाकरे ब्रँड; राजसाहेबांचं पत्र गेल्यावरच आली हाफकिनची परवानगी”

उच्चशिक्षित आईनं 6 महिन्यांच्या चिमुकलीसोबत केला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More