बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजी घ्या! कोरोनाची ही नवी लक्षणं आली समोर

मुंबई | देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. आता कोरोनाची नवी लक्षणं समोर येत आहेत. सर्दी-खोकला-ताप ही लक्षणं सोडून इतर काही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर सावध राहा.

कोरोना आता शरीराच्या वेगवेगळ्या अंगावर परिणाम करतो आहे. विशेषतः फुफ्फुसाप्रमाणेच आतड्यांवरही परिणाम करतो आहे. त्यामुळे पोटात तीव्र वेदना होणं हे कोरोनाचं नवं लक्षण आहे. अंग दुखल्यासारखं वाटत असेल म्हणजे स्नायूंमध्ये वेदना होत असतील तर हे कोरोनाचं लक्षण आहे.

पोटदुखी, उलटी, डायरिया, अंगदुखी अशी तक्रार घेऊन आलेले 40 टक्के रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

दरम्यान,  गुरूवारी दिवसभरात राज्यात तब्बल 56 हजार 286 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला  मिळालं, गुरूवारी 376 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 5 लाख 21 हजार 317 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या

‘महाराष्ट्राच्या नावावर काय खपवताय?’; राजेश टोपे संतापले

‘क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?’; अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

अखेर कोब्रा कमांडोला नक्षलवाद्यांनी सोडलं, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More