बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्दी-खोकल्याच्या आधी दिसू शकतात कोरोनाचे ‘ही’ लक्षणं; समोर आला नवा दावा

कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी सर्वजण योग्य ती काळजी घेत आहेत. मास्कचा वापर करणं, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुत राहणं, सोशल डिस्टंसिंगचं तंतोतंत पालन करणं या गोष्टी एव्हाना आपल्या अंगवळणी पडल्या असतील. एवढंच नाही तर, खोकला, सर्दी व ताप आलेल्या व्यक्तींपासूनही आपण आता चार हात लांबच असतो.

मात्र अमेरिकेतील एका संशोधनातून समोर आलेल्या दाव्यानुसार, मेंदूशी संबंधित आजारही कोरोना संक्रमण झाल्याची लक्षणं असू शकतात. याचाच अर्थ सर्दी, ताप, खोकला ही कोरोनाची प्राथमिक लक्षणं आढळून न येता, मेंदूच्या संबंधीत विकार झाल्यासही व्यक्ती कोरोना पाॅझिटीव्ह असू शकतो. अमेरिकेतील नाॅर्थवेस्टर्न मेडीसीन या संस्थेच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.

कोरोना बाधीत रूग्णांना सुरूवातीच्या टप्प्यात आढळून आलेल्या लक्षणांचा अभ्यास केला असता, जवळपास निम्म्याहून अधिक रूग्णांना न्यूराॅलाॅजिकल लक्षणं आढळून आली. डोकेदुखी, चक्कर येणं, एकाग्रता नसणं, अंगदुखी व मांसपेशीवर ताण येणं या प्रकारच्या लक्षणांचा यात समावेश होता. कोरोना विषाणू संबधी नवनवीन माहिती समोर येत असताना नाॅर्थवेस्टन संस्थेचा हा दावा नक्कीच महत्वाचा ठरणार आहे.

न्युरोलाॅजीक्स व कोरोनाचा परस्पर संबंध दर्शविणारं हे संशोधन डाॅ. इगोर कोरालनिक यांच्या टीमकडून पार पडलं. डाॅ. इगोर यांच्या मते, न्यूराॅलाॅजिकल लक्षणांची माहिती सर्वसामान्य लोक आणि आरोग्य प्रशासनाला माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण कोरोनाची प्राथमिक लक्षणं एखाद्या व्यक्तीत आढळून यायच्या आधी त्याला न्यूराॅलाॅजिकल लक्षणांची लागण होत असल्याचं संशोधनात समोर आलं आहे.

एवढंच नाही तर कोरोना व्हायरस हा पाठीचा कणा, मज्जातंतूसह माणसाच्या संपूर्ण Nervous System ला धोका पोहचवू शकतो. कोरोना बाधीत रूग्णांना साधारणतः फुफ्फुसं, किडनी व ह्रदयाशी संबंधित त्रास होत असतो. मात्र आजारादरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडला तर त्याचा थेट मेंदूवरही परिणाम होऊ शकतो.

मेंदूला गरजेचपुरता ऑक्सीजनचा पुरवठा न झाल्यास रूग्णास Clotting Disorders सारख्या गंभीर आजाराचाही सामना करावा लागू शकतो. एवढंच नाही तर कोरोना व्हायरसमुळे रूग्णाच्या रोगप्रतिकारक यंत्रणेवर सूज येऊन मेंदूला गंभीर इजाही होऊ शकतात. Annals of Neurology या जगप्रसिद्ध मासिकात हा समिक्षात्मक लेख प्रकाशित करण्यात आला आहे.

आपल्या या संशोधनात अधिक अचूकता येण्यासाठी डाॅ. इगोर यांनी न्युरो-कोव्हिड रिसर्च टीम तयार केली आहे. या टीमच्या माध्यमातून सर्व हाॅस्पिटलमधील कोरोना बाधीत रूग्णांचे सूक्ष्म विश्लेषण केले जाते. या रूग्णांत आढळणारी लक्षणं, होणारा त्रास यांच्या बारकाईने नोंदी काढल्या जातात. या विश्लेषणातून कोरोना काळातील न्यूराॅलाॅजिकल समस्यांचे प्रकार व योग्य उपचार पद्धती तयार करणं सोपं जाईल, असा टीमचा दावा आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

गौतम गंभीर म्हणाला, धोनीने मोठी चूक केली, त्याने ही चूक केली नसती तर…

शाळा सुरु करण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

असाही एक मुख्यमंत्री, स्वत:च्या सासऱ्यांचं निधन झालं असताना उद्धव ठाकरेंनी नियोजित बैठक घेतली!

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

“आपण झोपतो तेव्हा कोरोना विषाणूही झोपतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More