Top News तंत्रज्ञान

आतुरता संपली; नवीन टाटा सफारी लाँच, किंमतही ठरली

Photo Courtesy- Tata motors official website

मुंबई| सर्वांनाच आयुष्यात एकदा तरी नवीन कार घ्यायचं स्वप्न असतं आणि त्यासाठी काही लोक पैसेदेखील साठवत असतात. आजच्या घडीला बाजारात भरपुर कार उपलब्ध आहेत. पण आपल्याला स्वस्त आणि मस्त कार घ्यायची असते. अशाच कार प्रेमींसाठी टाटा मोटर्सने बाजारात एक भन्नाट कार आणली आहे. खुप दिवसांपासून ज्या गाडीची आतुरता लोकांना लागली होती ती गाडी आता बाजारात आली असून त्याची किंमत देखील ठरली आहे.

गेल्या 20 वर्षात लोकप्रिय ठरलेली टाटा सफारी ही गाडी आता नव्या स्वरुपात बाजारात आली आहे.  XE, XM, XT, XT+, XZ, XZ+ या सहा व्हेरियंटमध्ये टाटा सफारीला नव्या रूपात आणि नव्या किंमतीत लाँच करण्यात आलं आहे. टाटा सफारीत 6 ते 7 आसनक्षमता असलेले व्हेरियंट 14.69 लाखात उपलब्ध केले जाणार असून ही गाडी ऑटोमॅटीक ट्रान्समिशनची असणार आहे.

टाटा सफारीमध्ये शक्तीशाली 2.0 लिटर कायरोटेक इंजिन दिलं आहे, जे 170 बीएचपी पाॅवर आणि 350 एनएमपी टाॅर्क तयार करतं. याचसोबत ऑयस्टर वाईट इंटीरीयर, ऑशवुड फिनीश डॅशबोर्ड, पॅनोरॅमिक सनरुफ दिलं गेलं आहे. टाटा सफारी ओमेगा आर्किटेक्चरवर आधारीत असुन ती इंपॅक्ट 2.0 डिझाईन लँग्वेज तयार करते. यातील सर्वात प्रभावी XZ+ व्हेरियंट आता अॅडव्हेंचर माॅडलमध्ये सुद्धा तयार केलं गेलं आहे.

XZ+अॅडव्हेंचर माॅडेलमध्ये ‘टिपीकल मिस्ट’ रंगाची सफारी मँन्युअल आणि ऑटोमॅटीक या दोन्ही मोड मध्ये उपलब्ध असेल. त्याची किंमत अनुक्रमे 20.20 लाख रुपये आणि 21.45 लाख रुपये असेल.

टाटा सफारीची माॅडेलनुसार किंमत-

XE        – 14.69 लाख रुपये

XM      –  16 लाख रुपये

XT        – 17.45 लाख रुपये

XT+     – 18.25 लाख रुपये

XZ       – 19.15 लाख रुपये

XZ+    – 19.99 लाख रुपये

थोडक्यात बातम्या –

कोरोना नियमांचं उल्लंघन, भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण, अजित पवारांच्या बैठकीला होते उपस्थित!

‘…तर मला आज नातवंडे असती’; भाईजानने व्यक्त केली खंत!

शिवरायांच्या कन्येवरून भाजप-शिवसेनेत ‘ट्विट वॉर’

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राठोड मौन सोडणार??; पोहरादेवीला येणार दर्शनाला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या