बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसुख हिरेन प्रकरणात नवं वळण; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचा छापा

मुंबई | उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं सापडली होती. मनसुख हिरेन यांच्या मृत्युनंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं. मनसुख हिरेन प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर होते. त्यानंतर आता प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं छापा टाकला आहे.

मनसुख हिरेन प्रकरणात एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी झाली होती. सकाळी सहा वाजल्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाईला सुरुवात झाली आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहेत.

मनसुख हिरेन प्रकरणात दोन दिवसांपुर्वी एनआयएने मोठी कारवाई केली होती. एनआयएच्या पथकानं नव्यानं 2 जणांना अटक केली आहे. संतोष आणि आनंद अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहे. काही दिवसांपूर्वीच मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबद्दल अहवाल समोर आला आहे. मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग झालेला नाही. अटक करण्यात आलेल्या दोघांचं लातूर कनेक्शन समोर आलं होतं.

दरम्यान, परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्याविरोधात व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी गंंभीर आरोप केले होते. माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवलं आणि मारहाण केली, असा व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा आरोप होता. त्यानंतर प्रदीप शर्मा यांच्यावर कडाडून टीका झाली होती.

थोडक्यात बातम्या-

‘…तर लशीचाही फारसा काही उपयोग होणार नाही’; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

“उद्धव ठाकरे मोदींसमोर नाक घासून आलेत, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय?”

संभाजीराजेंना मुख्यमत्र्यांचं बोलावणं, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बैठकीकडे!

भाजपला मोठा धक्का?; 25-30 आमदार अन् 2 खासदार भाजप सोडण्याच्या तयारीत?

‘…त्या शुक्राचार्यांचं पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही’; नितीन राऊत आक्रमक

कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराचं सीरम?; भारत बायोटेक अन् केंद्र सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More