बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलगा सिद्धार्थ आणि पीएसह 10 जणांवर गुन्हा दाखल

पुणे | पिंपरी-चिंचवडमध्ये काल राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करून जीवघेणा हल्ला झाला होता. दरम्यान, या प्रकरणात अँथनी नावाच्या कंत्राटदारांची काही माणसं कार्यालयात येऊन बाचाबाची केली आणि कार्यालयातून बाहेर येऊन गोळीबार केला. अशाप्रकारे अण्णा बनसोडे यांनी खुलासा केला आहे.

या प्रकरणात आता आणखी मोठा खुलासा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे तसेच पीए यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

11 मे ला दुपारी अँथनीच्या कार्यालयात घुसून दोन कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँथोनी यांच्या कंपनीचा मॅनेजर तानाजी सावंत कुठे आहे हे न सांगितल्याच्या कारणातून दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे या आमदार पुत्रासह इतर 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील कैद झाल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आता अण्णा बनसोडे यांनी केलेला दावा फोल ठरला आहे. तसेच हे प्रकरण काहीतरी वेगळंच असल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी उलगडा पोलीस तपासात स्पष्ट होईलच.

थोडक्यात बातम्या

मुंबईतील सक्रिय रूग्णसंख्या घटली; बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं, वाचा आकडेवारी

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाकडून डाॅक्टरला मारहाण ; पाहा व्हिडीओ

‘प्राण जाये पर शान ना जाये’; कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांना असा होतोय तंबाखू आणि गुटख्याचा पुरवठा

‘पीएम केअरचा पैसा बाहेर काढा’; 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं मोदींना खुलं पत्र

‘…म्हणून भारतात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More