बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट; साक्षीदार तर निघाला फरार आरोपी

मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीनं अटक केली आहे. मुंबई क्रुझवर टाकलेल्या छाप्यात त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान झालेल्या खुलास्यांमुळे त्याला अटक करण्यात आलं. अशातच काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं आर्यन खानसह 7 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता आर्यन खानच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.

आर्यन खानच्या अटकेनंतर त्याला सोबत घेऊन जाताना किरण प्रकाश गोसावी आणि भाजपचे नेते मनीष भानुशाली उपस्थित होते. यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. गोसावी या प्रकरणातील साक्षीदार आहे मात्र आता गोसावी एनसीबीच्या अडचणी वाढवताना दिसत आहे.

गोसावीच्या विरुद्ध मुंबईसह आणखी तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. तर एकामध्ये तो अद्यापही फरार असल्याचं रेकॉर्डवर आहे.

दरम्यान, आर्यनला घेऊन जाताना किरण प्रकाश गोसावी आणि भाजपचे नेते मनीष भानुशाली दोघेही अधिकारी असल्याचं सर्वांना वाटलं होतं. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळत चाललं आहे.

थोडक्यात बातम्या – 

महामार्गासाठी जमीन दिल्यास मिळणाऱ्या मोबदल्यात कपात; शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर

“फोनवरून टिका करणं सोपं आहे, मात्र तिकडे एनसीबीचे लोक लढा देतायेत”

प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनित पाठकचा पत्नीसोबतचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

शासकिय आणि निमशासकिय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

अखेर ब्रिटननं भारताचं ऐकलं; दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More