बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई पोलिसांच्या तपासाला ब्रेक; शाहरूख खानच्या ‘या’ पावलामुळे समीर वानखेडेंना दिलासा

मुंबई | मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवरून अभिनेता शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून चर्चेत आलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्यांच्यावरील आरोपांनंतर चांगलेच अडचणीत सापडले होते.

शाहरूख खानची मॅनेजर पुजा ददलानीला या प्रकरणात समन्स बजावण्यात आले होते. पण पुजा ददलानीने अद्यापही कोणता जबाब नोंदवला नसल्याने या प्रकारणाच्या तपासाची गती थंडावली आहे. शाहरूख खान किंवा त्याची मॅनेजर कोणीही या प्रकरणात समोर येऊन काहीच बोलले नसल्याने समीर वानखेडेंना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुजा ददलानी (Pooja Dadlani) जबाब नोंदपत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यामुळे या कथित खंडणी प्रकरणाचा तपास मुंबई पोलीसांच्या (Mumbai Police) एसआयटी पथकाने सध्या थांबवला असून कायदेशीर सल्ला घेतला जात आहे.

दरम्यान, आर्यन खानच्या (Aryan Khan) अटकेनंतर पुजा ददलानी आणि साक्षीदार किरण गोसावी यांच्यांत पैशांची देवाण घेवाण झाल्याचा दावा पंच प्रभाकर साईल याने केला होता. याच कथित खंडणी प्रकरणाचा तपास एसआयटीकडून केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

TET घोटाळा: “सुपेंवर महाविकास आघाडी सरकारचा वरदहस्त,नाहीतर हे शक्यच नाही”

घरी बसून खायचं म्हटलं तरी जास्तीचे पैसे मोजावे लागणार, नवीन वर्षात लागणार ‘हा’ नवा नियम

‘लाल किल्ला तुमच्या मालकीचा, मग 150 वर्षे का लावली’ वंशज म्हणणाऱ्यांना दिल्ली उच्च न्यायालयानं झापलं

एसटी संपात फूट! संप मागे घेण्याच्या घोषणेनंतरही कर्मचारी संपावर ठाम

“हे कसलं सरकार आहे ज्यांना सभागृह देखील सांभाळता येत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More