बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या आमदारावरील गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट, आमदारच संशयाच्या फेऱ्यात?

पुणे | पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काल गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता हळूहळू अनेक खुलासे होत असताना पाहायला मिळत आहेत. अण्णा बनसोडे यांनी अँथनी या कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या तानाजी पवारने आपल्या कार्यालयात येऊन गोळीबार केल्याचा दावा केला होता.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याच्या खुणा अजूनपर्यंत सापडल्या नाहीत. त्यामुळे आमदारांचा दावा फोल ठरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यातच एक सीसीटीव्ही फुटेज व ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तानाजी पवार आणि आमदार संजय बनसोडे यांच्यामधील ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अण्णा बनसोडे हे तानाजी पवारला धमकावत असल्याचं स्पष्ट होत आहे. तानाजी पवार याला फोन करून तू कुठे आहे सांग, मी तिथे येतो. एवढे फोन करूनही तू फोन उचलत नाहीस, एकदा येऊन तर जा ना! असं आमदार बनसोडे म्हणतात. तानाजी पवार मी मुंबईत आहे, असं सांगून तुमचं काय काम अडलंय ते सांगा, यावर तुझा मालक आजुबाजूला आहे का असं आमदार विचारतात आणि तानाजी पवार म्हणतो मी माझ्या वैयक्तिक कामासाठी मुंबईत आलोय. त्यावर आमदार साहेब तुझ्या मालकाशी बोलतो, असं उत्तर देतात आणि शिवीगाळ करायला सुरुवात करतात.

तानाजी पवार म्हणतो की, जनप्रतिनिधीला अशी भाषा शोभत नाही मी तुमच्याशी इज्जतीने बोलतोय आणि तुम्ही शिव्या देत आहे त्यावर आमदार पुन्हा शिवीगाळ करतात आणि तू उद्या ये असं म्हणतात. या ऑडिओ क्लिपमुळे सध्या एकच खळबळ माजली आहे. तर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितलं आहे. या सर्व प्रकरणामुळे आता आमदार संशयाच्या फेऱ्यात सापडल्याचे चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

शेवटच्या घटका मोजणाऱ्या आईसाठी त्यानं गायलं गाणं, डॅाक्टरलाही रडू कोसळलं

‘…तर हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते’; बच्चू कडू पंतप्रधान मोदींवर कडाडले

लॉकडाऊनला कंटाळून सलून व्यावसायिकाची आत्महत्या; ‘या’ शहरातील धक्कादायक घटना

…म्हणून भारतीय संघात भुवनेश्वरला स्थान मिळालं नाही, समोर आलं मोठं कारण!

आमदार अण्णा बनसोडेंवर गोळीबार प्रकरणात CCTV फुटेज व्हायरल ; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More