बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्रा प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आलं समोर

मुंबई | सध्या अश्लील व्हिडीओ प्रकरणी चर्चेत असलेलं नाव म्हणजे उद्योगपती राज कुंद्रा. अश्लील चित्रपटांची निर्मिती आणि अश्लील अ‍ॅप प्रकरणी 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक गोष्टींचे धागेदोरे समोर आले आहेत. अशातच आता याप्रकरणी आणखी मोठी अपडेट समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शर्लिन चोप्रानं त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. राजनं त्याच्या व्हिडीओमध्ये काम करण्यासाठी आपल्याला विचारणा केल्याचं तिनं म्हटलं होतं. त्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं शर्लिनला समन्स बजावला आहे.

राज कुंद्राच्या अटकेनंतर शर्लिननं ट्विटरवर व्हिडीओ अपलोड केला होता. त्यावेळी तिनं यापूर्वी महाराष्ट्र सायबर विभागानं केलेल्या चौकशीत याबाबतची माहिती दिली होती, असा दावा शर्लिननं केला होता. राज कुंद्रा प्रकरणामध्ये महाराष्ट्र सायबर सेलच्या टीमला सर्वात प्रथम जबाब देणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून ती मी होते, असंही शर्लिननं म्हटलं होतं.

दरम्यान, शर्लिननं राजसोबत जवळपास 15 ते 20 पॉर्न आणि सेमी पॉर्न प्रोजेक्ट केले आहेत. प्रत्येक प्रोजेक्टसाठी तिने 30 लाख रुपयांचा करार केला होता. मात्र राजनं पैसे देण्यासाठी खूप टाळाटाळ केल्यानं शर्लिननं त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला. सध्या या प्रकरणात बरीच नाव समोर यायला सुरुवात झाली असून अनेक धक्कादायक गोष्टीही समोर येत आहेत.

थोडक्यात बातम्या –

महापुरामुळे चिंताग्रस्त असलेल्या शरद पवार यांची तातडीची पत्रकार परिषद

‘लवकरच तो दिवस उगवेल’;संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा

अरे देवा! मंदिरात जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीत कोरोनाही चिरडुन गेला, पाहा व्हिडीओ

सकारात्मक बातमी! सोमवारी देशात मागच्या 100 दिवसातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद

पुरात अडकलेल्या कोरोना रूग्णाच्या मदतीसाठी सरसावले एनडीआरएफचे जवान, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More