बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खान प्रकरणाला नवं वळण, एनसीबी पंचानेच केले समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

मुंबई | मुंबई ड्रग्ज प्रकरण दररोज नवीन वळणं घेत आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर राज्यासह देशातील वातावरण जोरदार तापलेलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता या प्रकरणातील प्रमुख पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

नवाब मलिक हे सतत आरोप करत होते. पण आता प्रमुख साक्षीदारानेच मोठा गौप्यस्फोट केला आहे. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. के.पी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटींपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे. साईलच्या या प्रतिज्ञापत्रानं राज्यात खळबळ उडाली आहे.

आपण के.पी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे. क्रुझवर छापेमारी झाल्यानंतर शाहरूख खानची मॅनेजर पुजा ददलानी आणि के.पी गोसावी यांच्यात गोसावीच्या ब्लू मर्सिडीजमध्ये 15 मिनिटं चर्चा झाल्याचा खुलासा साईलनं केला आहे. गोसावीसोबत मी ही क्रुझवरील कारवाईवेळी तिथे उपस्थित असल्याचा दावा साईलनं केला आहे.

दरम्यान, गोसावी नाट्यमयरित्या गायब झाला आहे. गोसावीच्या जीवाला धोका असल्याचं साईलनं म्हटलं आहे. परिणामी आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं 100 कोटींचं घबाड; नोटा मोजायला लागला ‘इतका’ वेळ

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा मोठा गोंधळ, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्याच नाही

‘या’ रेल्वे स्थानकावर 55 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली

…तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा- संजय राऊत

भाजपचा आणखी एक नेता म्हणतो, ‘माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More