बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओमिक्रॉनच्या नव्या सबव्हेरिएंटबद्दल धक्कादायक माहिती समोर

मुंबई | ओमिक्राॅनचा नवीन सबव्हेरिएंट भारतातील 10 राज्यांत सापडला असल्याची माहिती इस्राइल शास्त्रज्ञांनी दिली आहे. BA.2.75 असे या सबव्हेरिएंटचे नाव आहे. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती दिली नाही. टेल हाशोमर येथील शेबा मेडिकल सेंटरमधील केंद्रीय विषाणूशास्त्र प्रयोगशाळेतील डॉ. शेफ्लीशाॅन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आत्तापर्यंत BA.2.75 चे 85 क्रम प्रामुख्याने भारतातील 10 राज्यांमधून आणि 7 देशांमधून प्राप्त झाले आहेत.

भारतात राजधानी दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ओमिक्रॉनच्या सबव्हेरिएंटची प्रकरणं आढळली आहेत. दरम्यान, जपान, जर्मनी, युनायटेड किंगडम, कॅनडा, युनायटेड स्टेट, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही या व्हेरिएंटची प्रकरणे आहेत. BA.2.75 हा व्हेरिएंट प्रभावशाली आहे की नाही हे अद्याप कळू शकले नाही. परंतु शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, हा वेरीअंट घातक असावा.

हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याची प्राथमिक माहिती आहे. BA.4 आणि BA.5 हे ओमिक्राॅन सबव्हेरिएंट आहेत जे भुतकाळातील स्ट्रेनपेक्षा जास्त संसर्गजन्य आहेत. हे सबव्हेरिएंट लस आणि अँटीबाॅडीजपासून सहज सुटू शकतात. ते लवकरच युरोप आणि यूएसमध्ये प्रबळ स्ट्रेन बनू शकतात.

आरोग्य तज्ञांच्या मते, एप्रिलमध्ये अफ्रिकेतल्या शास्त्रज्ञांनी प्रथम पाहिलेल्या या जाती जगभरातील डझनभर देशांमध्ये आढळून आल्या आहेत. हा सबव्हेरिएंट जागतिक स्तरावर वाढत आहेत कारण ते इतर प्रसारित व्हेरिएंट विशेत: BA.2 पेक्षा वेगाने ते पसरु शकतात.

थोडक्यात बातम्या –

“शरद पवार बोलतात त्याच्या नेहमी उलट होतं, त्यामुळे…”

ओमायक्राॅनचा नवीन सबवेरीअं

‘…ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र’, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

‘दाल मे कुछ काला है, 106 आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यंमंत्री होत नाही म्हणजे काय?’

‘…तर शिंदे साहेब महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल’, शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More