Top News देश

“ब्रिटनमधील नवीन विषाणूचे अस्तित्व अनेक देशात असण्याची शक्यता”

नवी दिल्ली |  ब्रिटनमध्ये नुकताच कोरोना संसर्गाचा एक नविन विषाणू आढळून आलाय. ब्रिटनमध्ये सापडलेल्या या विषाणूचे अस्तित्व अनेक देशात असू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामीनाथन बोलत होते. त्यावेळी नव्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक काटेकोरपणे अंमलात आणण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

नवा विषाणू 70 टक्के अधिक प्रमाणात संसर्गजन्य असल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी विकसित करण्यात आलेली लस नव्या विषाणूला रोखण्यात कितपत यशस्वी ठरेल? याबाबत शंका घेण्यास वाव असल्याचेही डॉ. स्वामीनाथन म्हणाले.

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाचा एक नवा विषाणू आढळून आला आहे, त्यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीचा धसका!; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उचललं मोठं पाऊल

धक्कादायक! लंडनमधून भारतात आलेल्या ‘त्या’ विमानात सापडले कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशी

‘तयार रहा… बिहारमध्ये पुढच्या वर्षीही निवडणुका होऊ शकतात’; तेजस्वी यादवांनी केला गौप्यस्फोट

“मोतीलाल वोरांचं आयुष्य हे जनसेवेचं आणि काँग्रेसच्या विचारांप्रती असलेल्या निष्ठेचं आर्दश उदाहरण”

देशात कोरोना साथीचा वाईट काळ सरल्याची चिन्हे- केंद्रीय आरोग्यमंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या