मुंबई | गेल्या दोन वर्षापासून कोरोना (Corona) महासाथीच्या रोगानं जगभरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. कोरोना साथीच्या रोगानं अनेकांचं नुकसान करत संपूर्ण जनजीवन विस्कळीत करुन टाकलं आहे. अशातच कोरोनाशी दोन हात करत असताना आता आणखी एका साथीच्या आजारानं डोकं वर काढलं आहे.
जगातील काही देशात रिनो व्हायरस (Rhinovirus) नावाच्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराची लक्षणंही (Symptoms) कोरोनाच्या लक्षणासारखीच आहेत, असं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगतिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकादा टेंशन वाढण्याची शक्यता आहे.
ब्रिटिश सरकारने जारी केलेल्या नव्या गाईडलाइन्सनुसार रुग्णाची कोरोटा टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्याला डोकेदुखी, खोकला, किंवा सर्दीचा त्रास होत असेल तर ही Rhinovirus ची लक्षणं असू शकतात. अशा परिस्थितीत रुग्णाला घरात विलिगीकरणात ठेवण्यात यावं, असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, कोरोना सारख्याचं लक्षणांमुळे नागरिकांची चिंता पुन्हा वाढली आहे त्याचबोरबर भीतीचंही वातावरण झालं आहे. त्यामुळे याविषयी सावधानता बाळगण्याचं आवाहन तज्ज्ञांरकडून करण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या –
मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिलंय का? – संजय राऊत
संजय राऊतांचं मुंबईत शक्ती प्रदर्शन, भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले…
“पुढची 25 वर्षे महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही”
रोहित पवारांचा संजय राऊत यांना सल्ला, म्हणाले…
“शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर आहे का?, जर बाळासाहेब ठाकरे असते तर…”
Comments are closed.