वर्ल्डकप जिंकायचा असेल तर इंग्लंडला एवढ्या धावा कराव्या लागतील!

लाॅर्डस | आज क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर विश्वचषकातला न्यूझीलंड विरूद्ध इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होत आहे. याच न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 242 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या लियाम प्लन्केट आणि ख्रिस वोक्सनं प्रभावी मारा केला. प्लन्केटनं आणि वोक्सनं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर न्यूझीलंडच्या सलामीवीर हेन्री निकोलसनं ५५ धावांची तर टॉम लॅथमनं ४७ धावांची खेळी उभारली इंग्लंडने न्यूझीलंडला निर्धारित 50 षटकांमध्ये 8 बाद 241 धावांवर रोखलं आहे.

त्यामुळं लॉर्डसवरची ही फायनल जिंकून विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरायचं तर इंग्लंडसमोर २४२ धावांचं आव्हान आहे.

दरम्यान, विश्वचषक कोण आपल्या खांदयावर घेतो हे कळायला अवघे काही तास वाट पहावी लागणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-महाजनांना लागली विधानसभा तारखांची कुणकुण; म्हणतात ‘या’ तारखेला होणार निवडणूक

-युवराज म्हणतो, संघात माझी जागा अजूनही कोणाला घेता आली नाही!

धोनीच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात…

-आजीबाईने मारली बुमराहची स्टाईल; त्यावर तो म्हणतो…

-काँग्रेसची साडेसाती संपता संपेना; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

Loading...