बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वर्ल्ड कपआधी न्यूझीलंडला मोठा धक्का! संघातील ‘हुकमी एक्का’ जखमी

मुंबई | आता बहुप्रतिक्षित विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली आहे. प्रत्येक संघ आपापल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करताना पहायला मिळणार आहे. क्रिकेट जगतातील शेवटपर्यंत झुंजणारा संघ म्हणून न्यूझीलंडची ओळख आहे. न्यूझीलंड संघाचं नेतृत्व किवी बाॅय कर्णधार केन विल्यमसन करत आहे. मात्र आता विश्वचषकापुर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.

केन विल्यमसननं आपल्या अप्रतिम नेतृत्वात भारताला नमवत न्यूझीलंड संघाला कसोटी चॅम्पियन बनवलं होतं. परिणामी न्यूझीलंड संघाला केनकडून त्याच अप्रतिम खेळाची अपेक्षा आहे. आता केन विल्यमसनच्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळं केन विश्वचषकातील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंड संघाच्या दृष्टीनं केन संघात असणं फार महत्वाचं आहे. केन आपल्या नेतृत्वगुणांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. केनला क्रिकेट जगतात ‘कुल केन’ नावानं सुद्धा ओळखलं जातं. केन विल्यमसनला डाॅक्टरांनी काही दिवसांची विश्रांती करण्यास सांगितलं आहे त्यामुळे आता न्यूझीलंड संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, केन विल्यमसन इंग्लडविरूद्ध झालेल्या सराव सामन्यात खेळला होता. केन विल्यमसनच्या तब्येतीत लवकर सुधारणा नाही झाली तर मात्र न्यूझीलंड संघाच्या अडचणी वाढणार आहेत.

थोेडक्यात बातम्या

‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’; वानखेडे-मलिक वादात आता मनसेची उडी

पठ्ठ्यानं एकाच षटकात खेचले 8 षटकार; ‘या’ खेळाडूची क्रिकेटविश्वात चर्चा

अखेर सुयश आणि आयुषी अडकले विवाहबंधनात; पाहा फोटो

“उभा महाराष्ट्र मला ओळखतो, मी आयुष्यात कधीच बेईमानी केली नाही”

पहिल्यांदा टीका, आता अभिनंदन! चित्रा वाघ यांच्याकडून रूपाली चाकणकरांना खास शुभेच्छा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More