पुणे | लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या सुप्रिया सुळेंनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट होती, असं बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांनी चांगलं मताधिक्य सुळेेंना मिळवून दिलं आहे. याबद्दल सुळेंनी या दोन्ही नेत्यांचे आभार मानले.
मा.सहकारमंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांची आज पुण्यात सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना भेटून आनंद झाला. लोकसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. @Harshvardhanji pic.twitter.com/O1fP7Ky9v0
— Supriya Sule (@supriya_sule) May 27, 2019
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे खूप आभार. या पुढील काळातही तुमची साथ अशीच राहू द्या, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा दणदणीत पराभव करून खासदारकीची हॅट्रीक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-पराभवाने खचायचं कशाला?? अमिताभ बच्चनचे सिनेमेही फ्लॉप होतात- सुप्रिया सुळे
-हिंदूच्या सुरक्षेची जबाबदारी आता माझी आहे- इम्तियाज जलील
-बेगुसरायमधल्या मुस्लिम तरूणाला मारझोडीवरून ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया
-राजकीय संन्यास घेण्यावरून नाना पटोलेंनी मारली पलटी!
-राजा राममोहन रॉय ‘ब्रिटीशांंचा चमचा’; ‘ही’ अभिनेत्री बरळली
Comments are closed.