Kolhapur | विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती आला त्यानंतर राज्यभरात विजयी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. एकीकडे राज्यभरात जल्लोष सुरू असताना कोल्हापूरात मात्र मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतून नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले आहेत.
नेमकं काय घडलं?
चंदगड विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांच्या विजयी मिरवणुकी वेळी महिला औक्षण करत असताना जेसीबीच्या माध्यमातून शिवाजी पाटील यांच्या अंगावर गुलाल टाकला जात होता. त्याचवेळी आगीचा भडका उडाला.
विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास विजयी मिरवणुकीच्या वेळी शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे.
या घटनेत शिवाजी पाटील (Shivaji Patil) थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमध्ये काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महिलांनी शिवाजी पाटील यांचं औक्षण करण्यासाठी पुढे आल्या त्याचवेळी त्यांच्या अंगावर जेसीबीने गुलाल टाकण्यात आला. गुलाल आणि आग यांचा संपर्क आल्याने एकदम भडका उडाला. या घटनेमध्ये तीन ते चार महिला जखमी झाल्या आहेत. शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांना देखील भाजलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
निकालानंतर शिंदे गट अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, कुठं घडली घटना?
निकालाबाबत राऊतांचा अजबच दावा; म्हणाले, “जे घडलं त्याला धनंजय चंद्रचूड..”
मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम राहणार का?
शिंदेसेना ठरली वरचढ, पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
पतीच्या पराभवानंतर स्वरा भास्करची पोस्ट; म्हणाली, “EVM मध्ये घोटाळा..”