बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् स्वप्नांचा क्षणातच चुराडा झाला; नववधूला घरी घेऊन जाताना नवरदेवाचा रस्त्यातच झाला मृत्यू

चंद्रपूर | एक अत्यंत दुर्दैवी घटना आवळगावात घडली आहे. नववधूला घेऊन नवरदेव वाहनात बसल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. नाजूक अभिमन्यू पोहनकर असं मृत नवरदेवाचं नाव आहे. या घटनेनं दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे.

नाजूक पोहनकर यांचा विवाह ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील दीपाली नामक युवतीशी गुरुवारी ठरला होता. कोरोनामुळे मोजकेच वऱ्हाडी लग्नासाठी आवळगावला पोहचले. सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास आनंदाच्या वातावरणात नाजूक आणि दीपालीचा विवाह सोहळा पार पडला.

नववधूला घरी घेऊन जाताना अचानक नावरदेवाची प्रकृती बिघडली. रूग्णालयात नेत असताना रस्त्यातच नवरदेवाची प्राणज्योत मालवल्याची माहिती आहे.

दरम्यान, नुकतंच लग्न करून नव्या आयुष्याची स्वप्न रंगवत सासरी निघालेल्या दिपालीला या घटनेनं हादरवून सोडलं आहे. दोघांनी पाहिलेल्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

देशात कोरोनाचा कहर; अदर पुनावालांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे केली ही विनंती

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांची कविता तुफान व्हायरल

‘कोरोना आपला पिछा सोडणार नाही, त्यामुळे…’; पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

सरसंघचालक मोहन भागवत कोरोनामुक्त; एवढे दिवस राहावं लागणार विलगीकरणात

‘अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात…’; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More