बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवविवाहीत नवरीने केलेल्या ‘या’ कृत्याने नवराच नाही तर संपूर्ण सासरवाडीला हादरवून सोडलं!

नवी दिल्ली | आग्रा येथील एका घटनेनं संपुर्ण परिसरात एकच चर्चा रंगली आहे. नवविवाहीत नवरीने केलेल्या एका कृत्यामुळे केवळ नवराच नाही तर संपुर्ण सासरवाडी हैराण झाली आहे. या घटनेनंतर नवरदेव आणि सासरच्या लोकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच त्यानंतर जे झालं त्यानं पोलिसांना देखील कोड्यात टाकलं.

संबंधित घटना ही आग्रातील एत्माद्दौला येथील आहे. येथे रहिवासी असणारे नेमीचंद यांनी काही महिन्यांपुर्वी पंजाबमधील एका तरुणीसोबत आपल्या मुलाचा विवाह पार पाडला होता. संबंधित नवविवाहीत तरुणीचं नाव खुशबू असं असून तिच्या पतीचं नाव रामलखन असं आहे. लग्नाच्या काही महिन्यांनंतर संपूर्ण परिवार गुरुवारी एका लग्नाला गेले होते. घरी परतल्यानंतर खुशबू घरी नसल्याचं पाहून सर्वच हदरले.

रामलखन यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच खुशबू आपल्या घरातील दागिने आणि 50 हजार रुपये घेऊन फरार झाली असल्याचा आरोप नवऱ्याच्या कुटुंबियांनी केला. ही संपूर्ण माहिती मिळताच खुशबूचे घरातले देखील पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर आपल्या लेकीवर लावलेला आरोप खोटा असल्याचं खुशबूच्या घरातल्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पोलीस ठाण्यात लावलेला आरोप फेटाळत आपली मुलगी हरवली असल्याचं खुशबूच्या परिवारने सांगितलं. त्यानंतर दोन्ही कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्या सहमतीनं पोलिसांनी खुशबू बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली.

थोडक्यात बातम्या-

कोरोना रुग्णांना होतोय ‘म्युकर मायकोसिस’ हा गंभीर आजार; 20 जणांचे डोळे निकामी

पुण्यात भितीचं वातावरण तयार होऊ नये म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

आम्ही आमच्याकडून भारताला शक्य तेवढी मदत करू- कमला हॅरिस

मी काही उत्कृष्ट काम करत नाही, सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला – नितीन गडकरी

गायत्री मंत्राने कोरोना पळवणार?; मोदी सरकारचा नवा प्रयोग

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More