मुंबई। जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही 29 रुग्णांना याची लागण झाल्याचे आढळले आहे. जीवघेण्या कोरोनापासून वाचण्यासाठी योगगुरु बाबा रामदेव यांनी देशी पण रामबाण उपाय सांगितला आहे. योग आणि आयुर्वेदाद्धारे आपण कोरोनाचा सामना करु शकतो, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
रोगप्रतिकारशक्ती जास्त असणारे लोक कोरोनावर सहज मात करु शकतात, त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग महत्वाचा आहे. भस्त्रिका, कपाल भारती, आनुलोम विलोम हे तीन प्राणायम नक्की करावे असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. भस्त्रिका तीन मिनिटं, कपाल भारती तीन ते पाच मिनिटं, आनुलोम विलोम पाच मिनिटं करावे असं बाबा रामदेव यांनी सांगितले आहे.
गुळवेळ तुळस आणि हळद या गोष्टीमुळे कोरोना कमी होऊ शकतो. यामुळे तुम्ही सर्दी खोकला कमी करु शकता असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. त्यासाठी गुळवेल तीन कांडया घेऊन मिक्सरमध्ये भुकटी बनवावी. दोन ग्लासात पाण्यात उकळून ते एक ग्लास काढा करुन प्यावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते असा दावा बाबा रामदेव यांनी केलाय.
आवळा आणि कोरफोडचा रस रोज सकाळी घेतल्याने रागप्रतिकारशक्ती वाढते. 50 वर्षात मला कधीही सर्दी खोकला झाला नाही. हे रस आणि काढा कोरोना होण्याआगोदर, कोरोना झाल्यानंतरही घेऊ शकतो असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे
ट्रेंडिंग बातम्या
कोरोना व्हायरस जगाला ‘या’ चार गोष्टी शिकवणार- आनंद महिंद्रा
15 ते 20 आमदार संपर्कात; भाजप नेत्याचा धक्कादायक दावा
महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्यांना न विचारताच राष्ट्रवादीचे मंत्री निर्णय घेतात का?; भाजपचा सवाल
भाजप खासदाराची खासदारकी जाणार? न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश
पाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज आज माफ झाले; बच्चू कडूंनी शेअर केला व्हिडीओ
Comments are closed.