कोकण| कोरोनाने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळं मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त नुकसान झालं आहे. अशातच आता कोरोनाचा फटका कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनादेखील बसल्याचं पाहायला मिळत आहे.
मार्चपासूनच कोकणातल्या हापूसची परदेशवारी सुरू होते परंतु यावर्षी यावर कोरोनाच सावट आसलेलं पहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याने हवाई वाहतूक ठप्प झाली आहे. परदेशातून आंब्याचे व्यवहार करण्यासाठी येणारे खरेदीदारही कोरोनामुळं भारतात येणं टाळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या दिवसाला 4 हजार पेटी आंबा दररोज वाशी मार्केटला पाठवण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे उत्पादन कमी आहे. वाशी मार्केटला कोकणातून जाणार्या एकूण आंब्यापैकी 40 टक्के मालाची निर्यात होते.
यावर्षी हापूस आंब्याची निर्यात अधिक तापदायक ठरणार आहे. त्यामुळं कोकणातील बागायतदारांना स्थानिक बाजारपेठांवरच लक्ष केंद्रीत करावं लागेल, असंच सध्या चित्र आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”
“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांना दिलासा; 10 कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर
हनिमून झाल्यावर कळालं नवऱ्याला कोरोनाची लागण; पत्नी पळाली!
Comments are closed.