मुंबई। राज्यसभा निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान अर्ज भरणार आहेत. मुंबईतील विधानभवनात ते आपले अर्ज भरतील. राज्यातील 7 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 4 आणि भाजपचे 3 उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेकडून आतापर्यंत उमेदवार निश्चित झालेले नाहीत. तर भाजपनंही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. महाविकास आघाडीच्या 4 पैकी 2 जागा राष्ट्रवादी तर शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी 1 जागा लढवणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. 26 मार्चला होणाऱ्या या निवडणुकीसाठी 13 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. काँग्रेस उमेदवार नाव निश्चित करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आहे.
शिवसेना आणि काँग्रेस उमेदवार निश्चित झाले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. आज हे दोन्ही नेते आपला अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.
ट्रेंडिंग बातम्या
मी येतोय, तुम्ही सराव सुरु करा; आव्हाडांनी गणेश नाईकांना ललकारलं!
काका जरा जपून…, भाजप आमदाराचा शरद पवारांना इशारा
महत्वाच्या बातम्या
सामनाच्या अग्रलेखातून मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर शिवसेनेची बोचरी टीका
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यावर यशोधरा शिंदे म्हणाल्या…
Comments are closed.