न्यूज अँकरचा भररस्त्यात पाठलाग, हेल्पलाईनकडून मदत नाही

आग्रा | रात्री उशिरा काम संपवून घरी परतणाऱ्या न्यूज अँकरचा पाठलाग करुन तिला त्रास दिल्याची घटना आग्र्यात घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केलीय.

दामिनी माहौर असं या अँकरचं नाव आहे. तिने पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या गाडीच्या नंबरप्लेचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने ती खोटी असल्याचं सांगितलं. तसेच तिने त्याचा फोटो काढण्यास सुरुवात केल्यावर त्याने तोंड वेडेवाकडे करुन तिची खिल्ली उडवली.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराची तीने महिला हेल्पलाईन 1090ला माहिती दिली मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिने यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहिल्यानंतर ती व्हायरल झाली आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.

दरम्यान, हेल्पलाईन 1090च्या अधिकाऱ्यांनी दामिनीची माफी मागितली. तसेच 2 अधिकाऱ्यांची हकालपट्टीही केलीय.