बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा खेळ आता वेब सिरीजमध्ये दिसणार; “मी पुन्हा येईन” चा टीझर प्रदर्शित

मुंबई । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वर्षांपूर्वी “मी पुन्हा येईन” असं म्हणाले होते. तेव्हा त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं. देवेंद्रजींचं हे वाक्य जनतेच्या डोक्यात चांगलं फिट बसलं होतं. त्यामुळे फडणवीसांनी जनतेला केलेलं आव्हान हे पूर्ण झालं आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा आले. त्यांच्या या वाक्यावर सर्वत्र चर्चा तर रंगल्या. पण आता या पुन्हा येईन मागचा प्रवास लवकर वेबसिरीजच्या माध्यमातून पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय.

ओटीटी प्लॅटफॉर्म वर ही नवीन वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये दोन पक्षाचे नेते सत्ते साठी आमदारांची कशी पळवापळवी करतात हे दाखवण्यात आलंय. शिवाय राजकारणात कपट-कारसस्थान, फोडाफोडी आमदारांची मेगाभरती, संधी-साधूपणा, आणि सध्या रोजच्या चर्चेचा विषय ठरत असलेलं राजकारण यावरही वेबसिरीज असणार आहे.

“मी पुन्हा येईन” या सीरिजचे लेखक आणि दिगदर्शन अरविंद जगताप यांनी केलं. याची निर्मिती प्लॅनेट मराठी तसेच गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली. या सीरिजमध्ये उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे,अमित तडवळकर,रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे,राजेंद्र गुप्ता,रुचिका जाधव हे कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

प्लॅनेन्ट मराठीचे मुख्य संस्थापक अजय बर्दापूरकर यांनी माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, सध्याच्या राजकीय घडामोडीचा आणि या सिरींजचाच काही एक संबंध नाही. मात्र सिनेमा किंवा वेबसीरिजमध्ये तेच पाहायला मिळतं जे आपल्या आजूबाजूला घडत असतं.

थोडक्यात बातम्या-

श्रीलंकेचे गायब झालेले राष्ट्रपती गोटाबायांनी उचललं मोठं पाऊल, अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिवसेना संतप्त, शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर

कोट्यवधींचं घर खरेदी करत रणवीर-दीपिका झाले शाहरूखचे शेजारी, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल

पर्यटनासाठी जाणार असाल तर जरा थांबा, ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका, देशमुखांच्या जामीनाला आणखी एकदा नकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More